नाशिकमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचं महत्त्व नेमकं काय आहे? गोदाकिनारी होणारा महायज्ञ, गोदावरी देवी उत्सवाचा मगर वाहन असलेला स्वतंत्र ध्वजस्तंभ आणि कुंभमेळ्यासाठीचा गरुड वाहन असलेला मुख्य ध्वजस्तंभ यामागील धार्मिक परंपरा जाणून घेऊया.
या विशेष भागात नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी आणि पदाधिकारी शेखर शुक्ल व गायधनी यांच्याशी संवाद साधण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणारा ध्वजारोहण सोहळा, तपोवनातील मोदी मैदानापासून निघणारी नगर प्रदक्षिणा, यंदाच्या पूजेचे मानकरी सुहास शुक्ल आणि ६,५०० आदिवासी बांधवांची गोदाआरती अशा विविध मुद्द्यांवर या भागात चर्चा केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याची परंपरा, धार्मिक विधी आणि नाशिकच्या सांस्कृतिक वारशाची माहिती जाणून घेण्यासाठी पाहा ‘कुंभ उलगडताना’ हा विशेष कार्यक्रम.
आपलं नाशिक — आपला आवाज, बातम्या २४ तास!


