नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘आपलं नाशिक’ घेऊन आलं आहे खास कार्यक्रम ‘कुंभ उलगडताना’. कुंभमेळ्याची परंपरा, नाशिकची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख, गोदावरी तीराचं महत्त्व आणि कुंभाशी जोडलेल्या विविध पैलूंचा या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे सविस्तर आढावा. या विशेष भागात आपल्यासोबत आहेत महंत भक्तीचरणदास महाराज. कुंभमेळ्याची आध्यात्मिक परंपरा, साधू-संतांचं महत्त्व आणि नाशिकच्या कुंभाशी जोडलेली श्रद्धा, संस्कृती आणि परंपरा याबाबत त्यांच्याशी जाणून घेणार आहोत विविध पैलू. नाशिक म्हणजे केवळ कुंभनगरी नाही, तर त्र्यंबकेश्वर, पंचवटी, रामकुंड आणि गोदावरीच्या पवित्र तीरामुळे समृद्ध झालेली धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नगरी आहे. याच नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकची ही खास ओळख आणि कुंभाची परंपरा ‘कुंभ उलगडताना’ या कार्यक्रमातून समजून घेऊया. पाहा ‘कुंभ उलगडताना’ — फक्त ‘आपलं नाशिक’वर. आपलं नाशिक | आपला आवाज