ठाणे : ठाण्यातील मानपाडा परिसरात पूर्णेकर समर्थकांनी आंदोलन करत घोडबंदरहून ठाण्याच्या दिशेने जाणारा मुख्य रस्ता रोखला. हातात फलक घेऊन समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनादरम्यान रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आल्याने मानपाडा परिसरात वाहतुकीचा खोळंबा झाला. नौपाड्यानंतर मानपाड्यातही मुख्य रस्ता बंद झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. या आंदोलनाचा परिणाम घोडबंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर झाला.