सिन्नर : तालुक्यातील शहा गावात मध्यरात्री मेंढ्यांच्या वाड्यावर पशुधन चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. बलेनो गाडीतून आलेल्या चोरट्यांनी मेंढ्या, कोकरू आणि शेळ्या पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मेंढपाळ जागे झाल्याने चोरट्यांचा डाव उधळला.
चोरट्यांनी वाड्याची संरक्षण जाळी कापून आत प्रवेश केला आणि पशुधन गाडीत भरण्यास सुरुवात केली. आवाज ऐकून मेंढपाळांनी आरडाओरडा केला, तर कांदळकर बंधूंनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा पीडित मेंढपाळांनी केला असून, पशुधन परत मिळवून कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे.


