पेठ : विकासकामांची माहिती मिळत नसल्याच्या निषेधार्थ गोपाळ देशमुख यांनी पेठ पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित कागदपत्रांची माहिती दिली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पेठ तालुक्यातील विकासकामांच्या निविदा, कामवाटप समितीसमोरील अर्ज, मोजमाप पुस्तिका आणि अंतिम देयकांसह विविध कागदपत्रांची माहिती मागवण्यात आली होती. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही करण्यात आली. माहिती देण्याचे आदेश होऊनही टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत देशमुख यांनी उपोषण सुरू केले आहे.