नाशिक : गतवर्षीची रामरथ मिरवणूक, यंदाचे श्रावणी सोमवार आणि गणेशोत्सवातील यशस्वी गर्दी नियंत्रणाणानंतर आता आगामी नवरात्रोत्सवातही 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) आधारित कॅमेऱ्यांचा कडक पहारा राहणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांकडून अद्ययावत तंत्रज्ञानाची सातत्याने पडताळणी केली जात आहे.
घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत शहरात चोवीस तास कडक पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः कालिका देवी आणि चांदवडची रेणुका देवी यात्रोत्सवासाठी पोलिसांचा स्वतंत्र तात्पुरता नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून, तेथे वायरलेस सेटसह अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतील. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडून 'एक खिडकी योजने'द्वारे नवरात्रोत्सव मंडळांना अटी-शर्तींवर परवानग्या दिल्या जात आहेत. प्रत्येक मंडळाजवळ पोलीस अंमलदार व होमगार्ड तैनात असतील. सुरक्षेची खबरदारी म्हणून सर्व देवी मंडळांना सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करून डीजे व लेझर लाईट्सचा वापर करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
सिंहस्थाच्या पूर्वतयारीतून नवरात्रोत्सवात 'एआय'चा पहारा;
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


