दोन वर्षांपूर्वी मोठ्या खर्चातून काँक्रीट करण्यात आलेला रस्ता पुन्हा फोडण्यात आला आहे.
यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विकासकामांच्या नावाखाली नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रस्ता तयार करण्यापूर्वी युटिलिटीच्या कामांचं योग्य नियोजन का झालं नाही, असा सवाल नगरसेविका हेमलता पाटील यांनी केला आहे.
रस्ता पुन्हा फोडल्याने आता दुरुस्तीचा अतिरिक्त खर्च सरकारी तिजोरीवर पडण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तसंच रस्ता फोडणाऱ्या यंत्रणेकडूनच रस्त्याची दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे विकासकामांच्या नियोजनाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
दोन वर्षांतच काँक्रीटचा रस्ता पुन्हा फोडला; प्रशासनाच्या नियोजनावर सवाल
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#काँक्रीट रस्ता
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


