नाशिक : लाखो नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कालिका मातेचा यंदाच्या नवरात्रोत्सवातील सुवर्णशृंगार विशेष आकर्षण ठरणार आहे. देवीच्या शृंगारासाठी तब्बल १०० तोळे सोन्याचे दागिने आणि २५ किलो चांदीच्या वस्तूंचा वापर करण्यात आला आहे. या मौल्यवान दागिन्यांच्या सुरक्षिततेसाठी मंदिर विश्वस्त मंडळाकडून २ कोटी रुपयांचा विमाही उतरवण्यात आला आहे. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील यांनी ही माहिती दिली.
नाशिकमधील प्राचीन कालिका मंदिरात महालक्ष्मी, सरस्वती आणि कालिका मातेच्या मूर्तींना पारंपरिक दागिन्यांनी सजवण्यात येते. यामध्ये दोन बकुळहार, एक पुतळीहार, दोन मंगळसूत्रे यांसह विविध सुवर्णालंकारांचा समावेश आहे. याशिवाय देवीचा राजेशाही मुकुट, आकर्षक कंबरपट्टा आणि पूजाविधीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू चांदीपासून तयार करण्यात आल्या आहेत. या दागिन्यांवरील नक्षीकाम आणि पारंपरिक कारागिरी विशेष लक्ष वेधून घेते.
देवीच्या या दागिन्यांना धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व असून, भक्तांच्या श्रद्धेचे ते प्रतीक मानले जातात. नवरात्रोत्सवादरम्यान या मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी विश्वस्त मंडळाने विमा संरक्षणाची व्यवस्था केली आहे. विम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच त्याचे प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, पारंपरिक दागिन्यांना नवे रूप देण्यात आले असून, त्यांचे पूजाविधीतील स्थानही महत्त्वाचे आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात सोन्या-चांदीच्या या अलंकारांनी सजलेली कालिका मातेची मूर्ती भाविकांसाठी श्रद्धा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
कालिका मातेचा १०० तोळे सोन्याचा साज; २५ किलो चांदीच्या दागिन्यांनाही झळाळी!
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा; शेतकरी कन्यांचे विवाह अन् कुंभमेळ्यातील १३ आखाड्यांचे भोजन शिवसेना करणार!
नाशिक शहर
नाशिकमध्ये २ हजार ६३३ निरक्षरांची साक्षरता चाचणी; २२१ परीक्षा केंद्रांवर आयोजन
नाशिक शहर
आरंभ कॉलेजजवळ महिलेची पर्स चोरीला; सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
नाशिक शहर
नाशिकमध्ये ५०१ जणांच्या शंखनादानंतर गोदावरीची भव्य आरती
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई


