नाशिक रोड पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीला मोठं यश मिळालं आहे. विहितगावातील पुलाजवळ संशयास्पद हालचाली आढळून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत हत्यारासह तिघांना ताब्यात घेतलं.

संशयितांची चौकशी केली असता, त्यांच्या सहभागातून चेहेडी परिसरातील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या कारवाईदरम्यान सुमारे ७० हजार रुपये किमतीचं सोन्याचं मंगळसूत्रही जप्त करण्यात आलं आहे.

रात्रीच्या गस्तीच्या माध्यमातून संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याने परिसरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.