शहरात गॅस लाईन टाकण्याच्या एमएनजीएलच्या कामकाजावर आमदार देवयानी फरांदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नियोजनशून्य कामामुळे शहरभर रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरासाठी लाखो गॅस कनेक्शनचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत अपेक्षित काम पूर्ण झाले नसल्याचाही दावा करण्यात आला. महापालिकेतील आढावा बैठकीत एमएनजीएलच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रस्ते दुरुस्तीला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली. कामाची पद्धत न बदलल्यास नागरिकांचा रोष वाढेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
नाशिक शहर
ब्रेकिंग
एमएनजीएलच्या कामावर आमदारांचा हल्लाबोल; रस्ते खोदकामावर तीव्र नाराजी
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
#देवयानी फरांदे
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


