नाशिकमध्ये 5 Days Bankingच्या मागणीसाठी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. UFBUच्या नेतृत्वाखाली SBIच्या मुख्य शाखेसमोर निदर्शने करत आठवड्यातून पाच दिवस बँकिंग कामकाज आणि दोन दिवस साप्ताहिक सुट्टी लागू करण्याची मागणी करण्यात आली.
बँक कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी व्हावा आणि त्यांना वर्क-लाइफ बॅलन्स मिळावा, यासाठी 5 Days Banking लागू करण्याची मागणी आंदोलकांनी केली.
तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर केंद्र सरकार आणि इंडियन बँक्स असोसिएशनने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.


