सिडको परिसरातील माऊली लॉन्सजवळ जोरदार वाऱ्यामुळे अनधिकृत होल्डिंग आणि रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवरील बॅनर रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली. यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अनधिकृत होल्डिंगवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

विशेष म्हणजे, याच परिसरात यापूर्वीही बॅनर कोसळून दोन महिला जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

माऊली लॉन्स परिसरातील हा वर्दळीचा रस्ता असल्याने येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. अशा ठिकाणी होल्डिंग किंवा बॅनर कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

 

त्यामुळे महापालिका प्रशासनाने परिसरातील अनधिकृत होल्डिंग आणि धोकादायक बॅनरची तपासणी करून ते हटवावेत, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.