नाशिक शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वीजवाहिन्यांवरील देखभाल आणि विकासकामांमुळे ८ ऑगस्ट रोजी शहरातील काही भागांचा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

सिटी-१ वीजवाहिनीवरील विकास कॉलनी, सत्यम कॉलनी, उद्योग भवन, लवटे नगर, उंटवाडी, उत्कर्ष नगर, पोलीस प्रशिक्षण केंद्र, न्यायाधीश निवास, दत्तुभाई पटेल कॉलनी, उषा किरण सोसायटी, क्रांती नगर, त्र्यंबक रोड, संभाजी चौक आणि देनालक्ष्मी कॉलनी परिसराचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.

तसेच सिटी-३ वीजवाहिनीवरील महात्मा नगर, समर्थ नगर, पारिजात नगर, भोसला स्कूल परिसर, सावरकर नगर, शंकर नगर आणि निर्मल कॉलनी या भागांमध्येही वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

संबंधित कामांमुळे वीजपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी याची नोंद घेऊन आवश्यक ती पूर्वतयारी करावी.