नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून महापालिका आणि MNGL यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेला MNGLच्या पाइपलाइन खोदकामाला जबाबदार धरलं आहे.
यानंतर MNGLने महापालिकेला ३९२ कोटी रुपये दिल्याचा दावा केला आहे.
पुनर्स्थापना आणि अन्य उपयुक्तता शुल्कापोटी ही रक्कम भरल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
प्रति मीटर ५ हजार ते ८ हजार रुपयांप्रमाणे शुल्क भरल्याचा MNGLचा दावा आहे.
७४० किलोमीटरपैकी ६४० किलोमीटर पाइपलाइनचं काम पूर्ण झाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
मात्र रस्त्यांवरील खड्डे कायम असल्याने पुनर्स्थापनेची जबाबदारी नेमकी कुणाची, असा सवाल उपस्थित झाला आहे.
या मुद्द्यावरून महापालिका आणि MNGL यांच्यातील वाद आता चर्चेत आला आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
नाशिकच्या खड्ड्यांवरून महापालिका-MNGL आमनेसामने; ३९२ कोटींचा दावा
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


