नाशिकच्या सिद्धार्थ नगर प्रभाग क्रमांक २३ मधील ममता आनंद संकुल सोसायटीची संरक्षण भिंत रविवारी रात्री अचानक कोसळली.
भिंतीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आल्याने चार ते पाच दुचाकी ढिगाऱ्याखाली अडकल्या.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच योगेश आप्पा म्हस्के यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून ढिगारा हटवण्याचे काम केले.
ढिगारा हटवल्यानंतर त्याखाली अडकलेल्या दुचाकी बाहेर काढण्यात आल्या.
या घटनेनंतर संरक्षण भिंतीच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
भिंतीची तातडीने पाहणी करून बांधकामाची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन परिसरातील धोकादायक बांधकामांची पाहणी करावी, अशीही मागणी होत आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
सिद्धार्थ नगरमध्ये संरक्षण भिंत कोसळली; ४ ते ५ दुचाकी ढिगाऱ्याखाली अडकल्या
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


