नाशिकच्या प्रभाग क्रमांक १५ मधील भाभानगर परिसरात शेकडो वर्षे जुन्या विशाल वृक्षाच्या संभाव्य तोडीवरून नागरिक संतप्त झाले आहेत. निकुलेस बिल्डिंगसमोरील हा वृक्ष परिसराची ओळख मानला जात असून, कोणत्याही परिस्थितीत तो तोडू देणार नसल्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला आहे. वाढत्या बांधकामांमुळे शहरातील जुने वृक्ष कमी होत असताना या वृक्षाच्या तोडीची चर्चा सुरू झाल्याने पर्यावरणप्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत. प्रशासनाने या वृक्षाची तातडीने पाहणी करून वृक्षतोडीसाठी परवानगी देण्यात आली आहे का, याबाबत स्पष्टता करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक वारसा नष्ट करू नये, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. वृक्षतोडीचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे
नाशिक शहर
ब्रेकिंग
विकासाच्या नावाखाली वृक्षतोड नको; भाभानगरमधील वृक्षतोडीला नागरिकांचा तीव्र विरोध
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा; शेतकरी कन्यांचे विवाह अन् कुंभमेळ्यातील १३ आखाड्यांचे भोजन शिवसेना करणार!
नाशिक शहर
नाशिकमध्ये २ हजार ६३३ निरक्षरांची साक्षरता चाचणी; २२१ परीक्षा केंद्रांवर आयोजन
नाशिक शहर
आरंभ कॉलेजजवळ महिलेची पर्स चोरीला; सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
नाशिक शहर
नाशिकमध्ये ५०१ जणांच्या शंखनादानंतर गोदावरीची भव्य आरती
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई


