नाशिक : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जुना आग्रा रोडवरील मुंबई नाका ते गडकरी सिग्नल हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवार (ता. ११) घटस्थापनेपासून कालिका देवी यात्रोत्सवाला सुरुवात होत असून, यात्रेदरम्यान या मार्गाच्या दोन्ही बाजूंना व्यावसायिकांची दुकाने थाटली जातात. तसेच दुपारनंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. द्वारका सर्कलही पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला नसल्याने सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचवटीकडे जाण्यासाठी मुंबई नाका ते अशोकस्तंभ हा महत्त्वाचा मार्ग ठरला आहे. मात्र नवरात्रीत हाच मार्ग बंद होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता आहे.
वाहतूक शाखेने वाहनधारकांसाठी दोन पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. मुंबई नाक्याकडे जाणारी वाहतूक सारडा सर्कलमार्गे वळविण्यात येईल. तर मुंबई नाक्याकडून सीबीएस आणि अशोकस्तंभाकडे जाणारी वाहतूक रुची हॉटेलसमोरून चांडक सर्कलकडे वळविण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या मार्गांवर अतिरिक्त वाहतूक पोलिस आणि ट्रॅफिक वॉर्डन तैनात करण्यात येणार आहेत.
नाशिक शहर
ब्रेकिंग
नवरात्रीत जुना आग्रा रोड बंद; नाशिककरांसाठी दोन पर्यायी मार्ग | Apla Nashik
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
उघड्यावर मद्यपान आणि टवाळखोरीविरोधात अंबड पोलिसांची धडक कारवाई
नाशिक शहर
कुंभमेळा ध्वजारोहणासाठी नाशिक सज्ज! रामकुंडावरील तयारी अंतिम टप्प्यात
नाशिक शहर
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! ३० वर्षांची वयोमर्यादा हटवली
नाशिक शहर
नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक! कावळा की गिधाड? १० नोव्हेंबरपर्यंत मतदानाची संधी
नाशिक शहर
सिंहस्थ ध्वजारोहणापूर्वी रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम; विक्रेत्यांची पर्यायी जागेची मागणी


