त्र्यंबक रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सातपूर येथील दिलीप काळे यांचा २४ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला.
अपघातानंतर काळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर नाशिक शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणि खड्ड्यांच्या प्रश्नाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यापूर्वी खड्ड्यांमुळे जितेंद्रसिंग गिरासे, प्रभाकर निकम, उज्ज्वला गायकवाड, दीपाली बेळे, नीलेश कोतकर आणि मासूम शाह या सहा जणांच्या मृत्यूचा दावा करण्यात आला आहे.
दिलीप काळे यांच्या मृत्यूमुळे खड्ड्यांचा सातवा बळी गेल्याचा आरोप केला जात आहे.
पीडित कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासह निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न आणखी किती जीव घेणार? पाहा या घटनेचा VIDEO आणि जाणून घ्या नागरिकांच्या मागण्या.


