डोंबिवली : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून कल्याण-डोंबिवली परिसरात राजकीय वातावरण तापलं आहे. पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी मांडली आहे.
या प्रकरणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही मोरे यांनी दिला. हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असून, पूर्णेकर कुटुंबीयांना न्याय मिळण्याची मागणी होत आहे.
या प्रकरणातून राजकारण केले जात असल्याचा आरोप राजेश मोरे यांनी केला. दरम्यान, हत्या प्रकरणातील तपास आणि पुढील घडामोडींकडे लक्ष लागले आहे.


