मुंबई : शिक्षक मतदारसंघाच्या निकालावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. शिक्षकांनी आपल्या पेशाशी प्रामाणिक राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच ठाण्यातील पोलीस प्रशासन, शेतकरी आत्महत्या आणि टोरंट प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यांवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

ठाणे प्रकरणात संबंधितांना अटक करण्याची मागणी करत राऊत यांनी एसआयटीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. पाचशे कोटींच्या ऑडिओ क्लिपचा मुद्दा थांबवणार नसल्याचेही त्यांनी म्हटले. तसेच भाजपच्या निवडणूक निधीबाबत आरोप करत टोरंट प्रकल्पातील वृक्षतोडीविरोधात शिवसेनेकडून घेराव घालण्यात आल्याचा मुद्दाही त्यांनी मांडला.