ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी ओढ दिल्यानंतर आता सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये चिंता वाढली आहे.
विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम राहिल्यास खरीप हंगामातील पिकांसमोर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमधील पाऊस सोयाबीन, कापूस, तूर यांसारख्या पिकांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे पाऊस कमी झाल्यास उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो.
पावसाअभावी पाणीसाठे, भूजल पातळी आणि भविष्यातील पाणी उपलब्धतेवर काय परिणाम होऊ शकतो? खरीप पिकांचं नुकसान किती वाढू शकतं? आणि सप्टेंबरमध्येही पावसाची तूट कायम राहिल्यास महाराष्ट्रातील दुष्काळाचं संकट आणखी गडद होणार का?
या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा पाहा ‘आपलं नाशिक’च्या खास Explainerमध्ये.
📰 आपलं नाशिक | आपला आवाज


