नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सकाळी १० वाजता ही बैठक होणार आहे.
कुंभमेळ्याच्या काळात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या नियोजनाचा या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
महापालिका आयुक्तांसह संबंधित विभागांचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या संख्येने भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने कचरा आणि सांडपाण्याचे प्रमाण वाढणार आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेची सांडपाणी प्रक्रिया, कचरा संकलन, वाहतूक आणि विल्हेवाट व्यवस्थेबाबतची तयारी किती आहे, यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
कुंभमेळ्याच्या काळात शहर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचाही आढावा घेतला जाणार आहे.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पायाभूत सुविधांवर येणारा ताण आणि त्यासाठीचे नियोजन यावरही बैठकीत भर दिला जाण्याची शक्यता आहे.
समाजाचा कुंभ
ब्रेकिंग
कुंभमेळ्यासाठी सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनावर उद्या महापालिकेत बैठक
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
समाजाचा कुंभ
सिंहस्थावर सुरक्षेचे सावट! जीर्ण रामसेतूला बांबूचा आधार; रामझुला कधी पूर्ण होणार?
समाजाचा कुंभ
सिंहस्थासाठी नाशिक सज्ज! ! शंखनादापासून गोदावरी महाआरतीपर्यंत धार्मिक सोहळ्यांची पर्वणी
समाजाचा कुंभ
सिंहस्थ कुंभमेळा: श्री दिगंबर आखाडा परिसरातील निवास सुविधांसाठी ३.२८ कोटींच्या खर्चाला मंजुरी
समाजाचा कुंभ
सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर स्टॉल्सना परवानगी न देण्याची वाहतूक पोलिसांची मागणी
समाजाचा कुंभ
सिंहस्थासाठी पंचवटीचा कायापालट; काळाराम, कपालेश्वर मंदिर परिसरासाठी १२ कोटी मंजूर!


