श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिरात पहाटे ४ वाजता दर्शन सुरू होणार आहे. इतर दिवशी मंदिर पहाटे ५ वाजता खुले राहणार आहे.
यासोबतच कपालेश्वर आणि सोमेश्वर मंदिरातील दर्शनाच्या वेळांमध्येही बदल करण्यात आले आहेत. श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनाकडून गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र रांगा आणि विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


