निफाड शहरात सध्या मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, चौका-चौकात या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी गणपती दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हे कुत्रे धावून जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

या कुत्र्यांनी काही लहान मुलांना चावा घेतल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या त्रासाबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही मुख्याधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

या निष्क्रियतेचा निषेध म्हणून निफाडकरांनी थेट नगरपंचायत गाठली आणि मुख्याधिकाऱ्यांच्या टेबलावर चक्क चार कुत्रे सोडून अनोखे आंदोलन केले.