मध्यवर्ती ठक्कर बाजार बस स्थानक परिसरात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.

 याचा फटका एसटी चालकांसह प्रवाशांनाही बसत असून, त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ठक्कर बाजार बस स्थानक परिसरातील बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण आणण्याची गरज निर्माण झाली आहे.