नाशिकमध्ये आदिवासी शेतकरी शिष्टमंडळाने आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट घेत विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन सादर केले. जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आदिवासी भागातील अनेक प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.

शिष्टमंडळाने पेसा कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन तातडीने वितरित करावे, धान बोनसची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी तसेच सहकारी सोसायट्यांचे प्रलंबित कमिशनही लवकरात लवकर मंजूर करून वितरित करावे, अशी मागणी केली.

यावेळी आदिवासी भागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीतील अडचणी, शेतकरी आणि स्थानिक संस्थांना भेडसावणारे प्रश्न तसेच प्रलंबित कामांबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

शिष्टमंडळाने शासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन आदिवासी शेतकरी आणि संबंधित घटकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.