सटाणा : बागलाण तालुक्यातील चौगाव येथील शेतकरी सुरेश मांडवडे यांना कोबीला अत्यल्प भाव मिळाल्याने मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. दोन एकर कोबी पिकासाठी त्यांनी दीड लाख रुपये खर्च केले; मात्र बाजारात कोबीला अवघा दोन रुपये किलो भाव मिळाला. त्यामुळे त्यांनी उभ्या पिकावर रोटर फिरवून पीक नष्ट केले.
मांडवडे यांनी ४०६ किलो कोबी विकली, त्यातून सेवा शुल्क वजा जाता त्यांच्या हातात केवळ ६०९ रुपये आले. उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने त्यांनी शेतीमालाला रास्त भाव मिळण्याची मागणी केली आहे.


