आदित्य ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यानंतर नाशिकच्या विकासकामांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

उपमहापौर विलास शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, त्यांना नाशिकमधील विकासकामांची अधुरी आणि चुकीची माहिती मिळाल्याचा दावा केला आहे.

नाशिक शहरात तब्बल ३२ हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू असून, प्रशासन २४ तास काम करत असल्याचं विलास शिंदे यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंनी केवळ एका तासात नाशिकचा दौरा पूर्ण केल्याची टीकाही त्यांनी केली.

येत्या सहा महिन्यांत नाशिकमध्ये मोठा बदल दिसेल, असा दावाही विलास शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, नाशिकमधील खड्डे, सिंहस्थ विकासकामे आणि शहराच्या विकासावरून राजकीय वातावरण तापलं आहे.