नाशिकच्या जेलरोड परिसरातील पवारडी येथे रस्त्यातील मोठा खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात अजित भालेराव हा तरुण गंभीर जखमी झाला. दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्यावर जोरात कोसळला. या अपघातात त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने अजित भालेराव यांना उपचारासाठी सोपान हॉस्पिटलमध्ये दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया केली असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या अपघाताचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेनंतर जखमीच्या कुटुंबीयांनी तसेच स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या कथित निष्काळजी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.