काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या 'गुंगी गुडिया' वक्तव्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाकडे मोर्चा काढला.
मोर्चा काँग्रेस भवनाजवळ पोहोचल्यानंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंना शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
या आंदोलनानंतर 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून सुरू झालेला राजकीय वाद आणखी तीव्र झाला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, या प्रकरणाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे. दरम्यान, या घडामोडींनंतर पुढील राजकीय भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


