पंचवटी प्रभाग सभेत रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून माजी नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. खड्डे बुजवण्यासाठी तातडीने वर्क ऑर्डर काढण्याची मागणी करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

नागरिकांना खड्ड्यांमुळे होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात घोषणाबाजी करण्यात आली. वर्क ऑर्डर मिळेपर्यंत ठिय्या कायम ठेवण्याची भूमिका माजी नगरसेवकांनी घेतली.