नाशिकच्या जुन्या शहरातल्या चौकांना आणि बाजारपेठांना इतिहासाची मोठी परंपरा लाभली आहे. चौक मंडई, जहाँगीर मशीद चौक आणि वाकडी बारव परिसर यांच्याशी जोडलेल्या आठवणी, व्यापाराची परंपरा आणि जुन्या नाशिकची ओळख जाणून घेऊया या विशेष भागात. एकेकाळी चौक मंडई परिसर नाशिकमधील महत्त्वाचं व्यापारी केंद्र म्हणून ओळखला जात होता. जुन्या शहरातील बाजारपेठा, पारंपरिक व्यवसाय आणि ऐतिहासिक वास्तू नाशिकच्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात. काळानुसार शहर बदललं, बाजारपेठांचं स्वरूप बदललं; मात्र या ठिकाणांशी जोडलेल्या आठवणी आजही महत्त्वाच्या आहेत. नाशिकच्या चौकांचा इतिहास, जुन्या बाजारपेठांची कहाणी आणि शहराच्या बदलत्या रूपाचा मागोवा घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 📺 पाहत राहा आपलं नाशिक | आपला आवाज, बातमी २४ तास. व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि आपलं नाशिक YouTube चॅनेल Subscribe करा. #ChowkMandai #OldNashik #NashikHistory #NashikHeritage #NashikNews #AplaNashik