पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढल्याने शेतकरी आणि पशुपालकांसमोर संकट उभं राहिलं आहे. मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथील दूध उत्पादक शेतकरी संजय राजगे यांनी चार ते पाच दुभत्या जनावरांसाठी चारा खरेदी करण्यासाठी पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून ९० हजार रुपये उभे केले.
खरीप हंगाम वाया गेल्याने उत्पन्नाचा स्रोत कमी झाला असून, जनावरांच्या चाऱ्याचा खर्च भागवणं कठीण झालं आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवेढा परिसरात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी पशुपालकांकडून होत आहे.


