रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जलविद्युत प्रकल्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा चर्चेत आला आहे. या वृक्षतोडीला नाशिकमधील पर्यावरणप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवत एकत्र येऊन निषेध नोंदवला.

विकासकामांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षतोडीचे संभाव्य परिणाम याबाबत पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली. कर्जत तालुक्यातील संबंधित जलविद्युत प्रकल्पाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधात त्यांनी आपली भूमिका मांडली.

या विषयावर आपले प्रतिनिधी विठ्ठल भाडमूखे यांनी पर्यावरणप्रेमींशी संवाद साधला. प्रकल्पाबाबत त्यांचे आक्षेप, वृक्षतोडीविषयीची भूमिका आणि पर्यावरण संवर्धनासंदर्भातील मुद्दे या संवादातून समोर आले.