निफाड : तालुक्यात खरीप हंगामातील दुष्काळी नुकसानीचे १३५ गावांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये ८८ हजार ३७३ शेतकरी बाधित झाले असून, नुकसानभरपाईसाठी शासनाकडे ८३ कोटी ४ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.
पंचनाम्यांनुसार कोरडवाहू, बागायती आणि बहुवार्षिक फळपिकांसह एकूण ६२ हजार १७४.७३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी कृषी विभागाने निधीची मागणी केली आहे. ही माहिती तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी दिली असून, आता शासनाच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


