पत्रकार म्हणजे नेमकं काय? पत्रकारिता म्हणजे केवळ बातम्या देणं, की समाजाप्रती असलेली एक महत्त्वाची जबाबदारी? पत्रकारितेची मूल्यं शिक्षणसंस्थांमधून कशी रुजवली जातात? आणि आजच्या डिजिटल युगात पूर्वीसारखे पत्रकार घडत आहेत का? चॅनल्समधील स्पर्धा, सोशल मीडिया, ग्लॅमर आणि रिल्सच्या वाढत्या प्रभावामुळे पत्रकारितेचं स्वरूप बदलत आहे. या बदलांचा पत्रकारितेच्या मूल्यांवर नेमका काय परिणाम होतोय? आजच्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी, सत्यनिष्ठा आणि जबाबदारी यांची जाणीव कशी करून दिली जाते? या सर्व प्रश्नांवर जाणून घेऊया मविप्र संस्थेच्या पत्रकारिता विभागाच्या प्रमुख **प्रा. प्राची पिसोळकर** यांच्याशी खास संवादातून. गेल्या २० वर्षांपासून पत्रकारिता विभागाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेची मूल्यं रुजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयीही जाणून घेऊया. 📺 पाहा हा विशेष संवाद फक्त **आपलं नाशिक**वर! आपलं नाशिक | आपला आवाज बातमी २४ तास व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि चॅनल Subscribe करायला विसरू नका.