‘नवदुर्गा’ या विशेष मालिकेत भेटूया सुहासिनी सुभाष कुलकर्णी यांना! १९७६ पासून शिक्षिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी चित्रकला, हस्तकला, कविता, कथालेखन, संस्कार भारतीची रांगोळी आणि बाटीक बांधणी अशा विविध कलांचा छंद जोपासला आहे. पुण्यातील राजा दिनकर केळकर संग्रहालयात पैठणी चित्रशैलीचा अभ्यास करून त्यांनी कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या ‘गीत रामायण’वर आधारित चित्ररूप रामायण साकारले. तसेच काव्यसंग्रह, सामाजिक कार्य आणि विविध कलांविषयी मार्गदर्शन करत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा हा बहुआयामी कलाप्रवास, साहित्यसेवा आणि कलेप्रती असलेली निष्ठा जाणून घेण्यासाठी संपूर्ण मुलाखत पाहा. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या कथा पाहण्यासाठी आपलं नाशिक चॅनलला सबस्क्राइब करा. आपलं नाशिक | आपला आवाज #सुहासिनीकुलकर्णी #नवदुर्गा #कलाप्रवास #चित्रकला #हस्तकला #गीतरामायण #मराठीसाहित्य #महिलासक्षमीकरण #MarathiInterview #AplaNashik