दिल्ली : सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी दिल्लीत शिवसेनेच्या वतीने ‘सिंदूर महारक्तदान शिबिरा’चं आयोजन करण्यात आलं. जवानांसाठी गेल्यावर्षीपासून ‘सिंदूर महारक्तदान यात्रा’ राबवली जात असून, याच उपक्रमाचा भाग म्हणून या महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं.

या शिबिरात तब्बल १२०० पैलवानांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. चंद्रहार पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांना रक्ताची गरज भासल्यास मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

दरम्यान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही या महारक्तदान शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांनी पैलवानांच्या योगदानाचं कौतुक केलं. देशाच्या जवानांसाठी मोठ्या संख्येने रक्तदान करण्यासाठी पुढे आलेल्या पैलवानांचं त्यांनी अभिनंदन केलं.

शिवसेना नेते श्रीकांत शिंदे यांनीही रक्तदान करत या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यामुळे दिल्लीतील या महारक्तदान शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.

देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी रक्तदानाच्या माध्यमातून योगदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.