कळवणमधील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थिनीला ताप आल्याने तिच्यावर उपचार करण्यात आले होते. मात्र, अचानक प्रकृती खालावल्याने तिला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असतानाच तिचा मृत्यू झाला.
विद्यार्थिनीच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर प्रशासनाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, संबंधित प्रकल्प अधिकाऱ्यांना आश्रम शाळेला तातडीने भेट देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, आश्रम शाळेतील इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचीही तपासणी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाची आणि अन्नपदार्थांचीही प्रकल्प अधिकाऱ्यांकडून पडताळणी करण्यात आली आहे.
विद्यार्थिनीच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय, याचा तपास सुरू असून शवविच्छेदन अहवाल आणि चौकशीतील निष्कर्षांकडे आता लक्ष लागलं आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणातील पुढील घडामोडी आणि प्रशासनाच्या चौकशीचा सविस्तर आढावा पाहा ‘आपलं नाशिक’च्या या बातमीत.
आपलं नाशिक | आपला आवाज


