नागपूर : नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीदरम्यान गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. आठ उमेदवारांनी एकत्र येत निवडणूक प्रक्रियेविरोधात घोषणाबाजी केली.

 

या मतमोजणीत ३८ उमेदवार रिंगणात असताना मतमोजणीच्या टेबलवर केवळ पाच पेट्या ठेवल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. या व्यवस्थेवर आक्षेप घेत उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली.

 

मतमोजणी प्रक्रियेतून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही या उमेदवारांनी केला आहे. या प्रकारामुळे नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.