गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मुंबई नाका पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून तयारी करण्यात येत आहे.

गणेशोत्सव शांततेत पार पडावा आणि मिरवणुकांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई नाका पोलिसांनी पथसंचलन केले.