भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील मीठपाडा रोडवरील शत्रुंजय कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणात कच्चा कपडा आणि धागा तयार केला जातो.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची एक गाडी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, कंपनीला आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे


