CJP आंदोलनावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या आंदोलनाकडे आपण लक्ष देत नसल्याचं त्यांनी म्हटलं. आंदोलनाचा मुद्दा योग्य असेल, तेव्हा आपणही पाठिंबा दिला आहे; मात्र यावेळी आंदोलनकर्त्यांची भूमिका चुकीची असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. दुसरीकडे, अनेक वर्षांनंतर ठाकरे बंधू एका मुद्द्यावर एकत्र आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करत त्यांच्या एकत्र येण्याचं स्वागत केलं.