नाशिकच्या पंचक परिसरात भगवान श्री विश्वकर्मा जयंती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले.

या अभियानादरम्यान नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचविण्यासोबतच आरोग्य तपासणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.