नाशिक रोड विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांच्या कामकाजावरून महासभेत सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सदस्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्रिभुवन यांची तातडीने शासन सेवेत बदली करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली.

 

 

यावेळी अतिक्रमण विभागातील कनिष्ठ लिपिक अमित पवार यांच्या कामकाजाबाबतही गंभीर तक्रारी मांडण्यात आल्या. अखेर महापौर हिमगौरी आडके यांनी प्रज्ञा त्रिभुवन यांच्या बदलीचे निर्देश दिले, तर अमित पवार यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले.