दिल्लीच्या मतदार यादीत Special Intensive Revision म्हणजेच SIR अंतर्गत मोठी पडताळणी सुरू आहे. या प्रक्रियेत सुमारे 33.13 लाख मतदारांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये “Logical Discrepancies” आणि “No Mapping” अशा दोन प्रमुख श्रेणींचा समावेश आहे.
माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इतर प्रमुख नावांचाही या प्रक्रियेत समावेश झाला आहे. रेखा गुप्ता यांच्या नोंदीबाबतची विसंगती कागदपत्रांच्या पडताळणीनंतर दूर करण्यात आली आहे.
पण SIR ची नोटीस आली म्हणजे मतदाराचं नाव थेट मतदार यादीतून काढलं जातं का? SIR म्हणजे नेमकं काय? नोटीस का दिली जाते? आणि नोटीस मिळाल्यानंतर मतदारांनी काय करायचं?
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या दिल्लीतील SIR प्रक्रियेची संपूर्ण माहिती.


