सागरी भूमिपुत्र महासंघाची २९ सप्टेंबरला स्थापना; ठाण्यात स्थापना सोहळा

भूमीचा विकास झाला, मात्र भूमिपुत्रांचा विकास झाला नाही, असा मुद्दा उपस्थित करत सागरी भूमिपुत्र महासंघाची स्थापना करण्यात येणार आहे. २९ सप्टेंबरला ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महासंघाचा स्थापना सोहळा होणार आहे.

पाच जिल्ह्यांमध्ये महासंघाच्या माध्यमातून काम करण्यात येणार असून विविध संघटना एकत्र येणार आहेत. भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांवर महासंघाच्या माध्यमातून आवाज उठवला जाणार आहे.

गावठाण विस्ताराचा प्रश्न प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कोळीवाड्यांचे प्रश्न आणि स्थानिक रोजगाराचा मुद्दाही उपस्थित केला जाणार आहे. शासकीय प्रकल्पांमुळे भूमिपुत्रांवर अन्याय होत असल्याचा आरोप महासंघाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

या स्थापना सोहळ्यात भिकल्या धिंडा यांना ‘सागरी रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.