वर्धा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये तब्बल २१ दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाच्या पाहणीनुसार सोयाबीन उत्पादनात ३५ टक्क्यांपर्यंत, तर कापूस उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. रोगराईमुळेही शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या असून पीक नुकसानीचा सर्वे करून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.