माणसाचं रक्त दुसऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतं, हे मानवाला कधी आणि कसं समजलं? रक्तदानाचा इतिहास नेमका काय आहे? 🩸 पूर्वी रक्त एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला देण्याचे प्रयोग केले जात होते; मात्र काही वेळा त्यातून गंभीर परिणामही होत होते. १६२८ मध्ये विल्यम हार्वे यांनी रक्ताभिसरणाबाबत महत्त्वाचे संशोधन मांडले. त्यानंतर १८१८ मध्ये डॉ. जेम्स ब्लंडेल यांनी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मानवी रक्त देण्याच्या यशस्वी प्रयोगाची नोंद केली. पुढे १९०० मध्ये डॉ. कार्ल लँडस्टायनर यांनी रक्तगटांचा शोध लावला आणि रक्त संक्रमण अधिक सुरक्षित होण्याचा मार्ग खुला झाला. या भागात जाणून घ्या रक्तदानाचा इतिहास, रक्तगटांचा शोध, रक्त देताना रक्तगट जुळवणं का आवश्यक आहे आणि आधुनिक रक्तपेढ्यांची सुरुवात कशी झाली. पाहा विज्ञान, इतिहास आणि आरोग्याची रंजक माहिती देणारा ‘Knowledge Katta’चा हा विशेष भाग! 📺 पाहत राहा आपलं नाशिक आपलं नाशिक | आपला आवाज
Knowledge Katta
ब्रेकिंग
रक्तदानामागचं विज्ञान; जाणून घ्या रक्त संक्रमणाचा इतिहास
शेअर करा:
शेअर
टॅग्स:
संबंधित बातम्या
Knowledge Katta
कठपुतळी कलेचा इतिहास आणि तिचे ४ प्रमुख प्रकार | Knowledge Katta
Knowledge Katta
भारतात पहिली ट्रेन कधी आणि कुठून धावली? | Knowledge Katta | आपलं नाशिक
Knowledge Katta
रक्तदानामागचं विज्ञान; जाणून घ्या रक्त संक्रमणाचा इतिहास
Knowledge Katta
भारतीय सिनेमाची रंजक सुरुवात १८९६ मध्ये! | भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास | Knowledge Katta
Knowledge Katta
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा २०२७; इतिहास, परंपरा आणि महत्त्व


